Create your own blog website in 15 minutes.

आपल्या कौशल्य ला अनुसरून काम करून आपण पैसे तसेच प्रसिद्धी मिळवू शकतो.त्यासाठी एक प्रभावी माध्यम म्हणजेच ब्लॉगिंग होय.

ब्लॉगिंग

ब्लॉगिंग म्हणजे एखाद्या विशिष्ट किंवा अधिक विषय ला अनुसरून केले गेलेले लिखाण म्हणजे ब्लॉग होय.

जशी आपण डायरी लिहितो तसेच आपण ऑनलाइन लेख लिहून आपला ब्लॉग वाचकांपर्यंत पोहचवू शकतो.

यासाठी काही खास कौशल्य असणे गरजेचे ठरते.

त्यातील मुख्य म्हणजे ,जो विषयावर आपण लिखान करणार आहोत.

उदारणार्थ - पर्सनल फायनान्स , त्याच्याबद्दल माहिती तसेच वयक्तिक पातळीवर आवड असणे.

कारण हे काम म्हणजे एक दिवसाचा प्रकार नसतो तर यात कायम नवनवीन आणि दर्जेदार लिखाण आले पाहिजे.

चला तर मग पाहुयात ब्लॉग कसा बनवितात?

Create your own blog website in 15 minutes.


सर्वप्रथम आपण हे जाणून घेतले पाहिजे की ब्लॉग बनविण्यासाठी सोपे आणि सुलभ असे दोन प्लॅटफॉर्म उपलब्ध आहेत.
या दोन्ही प्लॅटफॉर्म वर काम करणे सोपे आहे.
दोन्ही प्लॅटफॉर्म वापरण्याचे वेगवेगळ्या प्रकारे फायदे तसेच तोटे देखील आहेत.

ब्लॉगर

हा नवीन ब्लॉगर मध्ये येऊ पाहणाऱ्या साठी खूप छान प्लॅटफॉर्म आहे.मुळात हा प्लॅटफॉर्म गुगल प्रॉडक्ट आहे.
त्यामुळे नवीन तसेच काही प्रो ब्लॉगर या प्लॅटफॉर्म ला प्राधान्य देतात.
गूगल चा प्रोडक्ट असल्याने एक मुख्य फायदा असा होतो की आपल्या ब्लॉग ची वेबसाईट कधीच डाउन होत नाही.
अगदी पूर्णपणे मोफत आणि अमर्याद जागेसह आपण इथे ब्लॉग बनवू शकता.

ब्लॉगर वर ब्लॉग बनविण्याचे फायदे


1 जसे मी वर उल्लेख केला आहे की सर्वात मोठा फायदा म्हणजे आपली ब्लॉग वेबसाईट कधीच डाउन होत नाही.
2 होस्टिंग आणि डोमेन साठी लागणार खर्च वाचतो.
3 गूगल प्रोडक्ट असल्याने लगेच रँकिंग मध्ये येतो.
4 ब्लॉगर वर आपल्या वेबसाइट ची सुरक्षिततेच प्रश्न निर्माण होत नाही कारण गुगल पूर्णपणे आपली वेबसाईट सुरक्षित ठेवतो.
5 तसेच SSL Certificate गुगल मोफत पुरवतो.
6 आपल्या ला अमर्याद जागा उपलब्ध होते.

ब्लॉगर वर ब्लॉग बनवण्याचे काही तोटे


1 ब्लॉगर काही मोजक्याच थिम्स पुरवत असल्याने आपल्याला पाहिजे तशी वेबसाईट डिझाईन करता येत नाही.
2 ब्लॉगर वर अतिरिक प्लगइन वापरता येत नाही.
3 तसेच seo साठी काही प्लगइन उपलब्ध नाही.
3 ब्लॉगर वर हवा तसा ब्लॉग डिझाईन करण्यासाठी किंवा प्लगइन वापरण्यासाठी कोडींग चे ज्ञान असणे आवश्यक असते. जे एका नवीन ब्लॉगर ला शक्य नसते.

ब्लॉगर वर ब्लॉग बनविण्यासाठी खालील प्रमाणे अनुसरण करा.


1 ब्लॉगर ची ऑफिसल वेबसाईट blogger.com उघडा.
2 आपले गुगल चे खाते असेल तर लॉगिन करा अन्यथा नवीन गुगल खाते तयार करा.
3 ब्लॉगर लॉगिन झाल्यावर आपल्यापुढं नवीन ब्लॉग तयार करा असा पर्याय येईल तो सिलेक्ट करा.
4 आपल्या ब्लॉग साठी नाव निवड करा.
5 ब्लॉग साठी पत्ता निवडा.
6 आपली प्रोफाइल सेटअप करा.
या प्रकारे अगदी 6 पायरीमध्ये आपला ब्लॉग तयार झाला.
उदारणार्थ.

वर्डप्रेस 


ब्लॉगर नंतर सगळ्यात जास्त प्रसिध्द असणारा ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म.
जगातील जवळपास 40% वेबसाईट या प्लॅटफॉर्म वर चालतात.

यामध्ये प्रामुख्याने दोन प्रकार पडतात.


1 वर्डप्रेस डॉट कॉम - या मध्ये अगदी ब्लॉगर सारख फ्री मध्ये ब्लॉग बनवता येतो.

त्यासाठी डोमेन आणि होस्टिंग पण मिळेल पण डोमेन हा वर्डप्रेस डॉट कॉम चा सब-डोमेन असतो.
सब-डोमेन वर काम करून आपण वेळ व्यर्थ घालवण्यापेक्षा दुसरा पर्याय निवडावा ,अस मला वाटत.

2 वर्डप्रेस ऑर्ग - हा प्लॅटफॉर्म विनामूल्य असला.

तरी याचा वापर करण्यासाठी आपल्याला एक स्वतंत्र डोमेन आणि वेब होस्टिंग ची खरेदी करावी लागते.
तेव्हा वर्डप्रेस ऑर्ग वापरता येते.


वर्डप्रेस ऑर्ग वापरण्याचे फायदे


1 आपल्याला हवी तशी वेबसाईट बनवता येते.
2 प्रामुख्याने जर ई-कॉमर्स वेबसाईट असेल तर वर्डप्रेस केव्हाही उत्तम.
3 अनेक थिम्स आणि प्लगइन मोफत वापरण्यासाठी मिळतात.
4 वर्डप्रेस प्रसिध्द असल्याने याची समस्या वर उपाय लगेच उपलब्ध होतो.
5 डिझाईन साठी कोडींग आली नाही तरी सुद्धा छान वेबसाईट बनवू शकतो.

वर्डप्रेस ऑर्ग वापरण्याचे तोटे


1 आपल्या ब्लॉग वेबसाईट ची सुरक्षितता पूर्णपणे आपल्यावर अवलंबून असते.
2 होस्टिंग आणि डोमेन चा खर्च करावा लागतो.

ओर्डप्रेस ऑर्ग वर कसा ब्लॉग बनवायचा

ओर्डप्रेस ऑर्ग वापर करण्यासाठी होस्टिंग घ्यावी लागते.
प्रत्येक होस्टिंग कंपन्या आता 1 क्लिक वर्डप्रेस इन्स्टॉल करण्यासाठी पर्याय देतात.

Softaculous हे सॉफ्टवेअर एक क्लीक मध्ये वर्डप्रेस इन्स्टॉल करण्याची सुविधा देते.1 Comments

Previous Post Next Post