झिंबॉम्बे या देशाबद्दल माहिती | Zimbabwe information in marathi

झिंबॉम्बे या देशाबद्दल माहिती (Zimbabwe information in marathi) मित्रांनो काय तुम्ही माझ्या या बोलण्यावर विश्वास ठेवाल का? जर तुम्ही एक बॅग भरून पैसे घेऊन एका स्टोअर मध्ये गेलात आणि त्या बदल्यात तुम्हाला फक्त एक बिस्कीट चा पुडा मिळाला. तर याचे उत्तर हो आहे. मित्रांनो आज आपण ज्या देशाबद्दल जाणून घेणार आहोत त्या देशांमध्ये एकेकाळी असंच घडत होतं. मित्रांनो एक असा देश जो की एका काळात खूप श्रीमंत होता. पण आता या देशात सर्वात जास्त गरिबी आणि बेरोजगारी आहे. मित्रांनो या देशाने गेल्या दहा वर्षांमध्ये खूप चढउतार पाहिले आहेत.

तरीही येथील लोकांच्या चेहऱ्यावरून हास्य कधीच कमी झाले नाही. आज मी तुम्हाला ज्या देशाबद्दल माहिती सांगणार आहे तो आपल्या मध्येच एक वेगळा देश आहे. कारण येथे जंगली लाईफ बद्दल इतका सुंदर दृश्य दिसेल की, कोणीही याचा अंदाज लावू शकणार नाही. आज मी तुम्हाला आफ्रिकेतील झिंबॉम्बे या देशाबद्दल माहिती (Zimbabwe information in marathi) सांगणार आहे.


Zimbabwe information in marathi


झिंबॉम्बे या देशाबद्दल माहिती (Zimbabwe information in marathi):

मित्रांनो झिंबॉम्बे चे नाव तुम्ही अनेकदा ऐकलं असेल खासकरून क्रिकेटमुळे. याशिवाय अशा अनेक खास गोष्टी आहेत ज्या तुम्हाला माहीत नाहीत.  आफ्रिकी महाद्वीप च्या दक्षिण भागात आणि लिंपोपो नदीच्या मध्ये वसलेल्या या देशाला अधिकारानुसार भलेही झिंबोंबे गणराज्य म्हणत असले तरीही पूर्वी याला दक्षिण ह्रोडेशिया गणराज्य आणि झिंबॉम्बे ह्रोडेशिया च्या नावाने ओळखले जात होते.

झिंबॉम्बे देशाच्या चारही बाजूस वेगवेगळ्या देशांच्या बॉर्डर आहेत. हे वेगवेगळे देश बोत्स्वाना झांबिया आणि मोझांबिक यांच्या बॉर्डर झिंबॉम्बे ला येऊन मिळतात. झिंबॉम्बे ची एकूण लोकसंख्या 1 करोड 44 लाख आहे. आणि हा देश तीन लाख 90 हजार 757 स्क्वेअर किलोमीटर मध्ये बसलेला आहे. जर आपण याच्या डेन्सिटी चा विचार केला तर 26 लोक पर किलोमीटर दिसून येतात.

Lokmanya Tilak Information in Marathi

झिंबॉम्बे विषयी काही आश्चर्यकारक रोचक तथ्य (Amazing facts about Zimbabwe in Marathi):

मित्रांनो तसं तर जगभरातील प्रत्येक देशांमध्ये घटस्फोटीत लोकांसाठी वेगवेगळे नियम आणि परंपरा आहेत. आणि मोठ्या प्रमाणावर घटस्फोटित घटना समोर येतात. परंतु इतर देशांच्या तुलनेत झिंबॉम्बे मध्ये घटस्फोटित घटना खूप कमी पाहायला मिळतात. याचं कारण आहे झिंबॉम्बे मधील महिला घटस्पोटाला एका कलंक प्रमाणे मानतात आणि असं करण्यापासून त्या वाचतात. आजही येथील महिलांमध्ये मान्यता आहे की जर पुरुष घटस्फोट मागत असेल तर सर्व चूक महिलांची आहे.

मित्रांनो झिंबॉम्बे च्या इतिहासातील सर्वात मोठा दिवस आहे 18 एप्रिल. कारण याच दिवशी सन 1980 मध्ये हा देश युनायटेड किंग्डमच्या गुलामीतून मुक्त झाला होता. होय मित्रांनो याच्या पूर्वी अनेक वर्ष हा देश आपल्या देशाप्रमाणेच दुसऱ्या देशाच्या गुलामीत होता.

मित्रांनो या देशा बद्दल ची ही गोष्ट केल्यानंतर तुम्हाला नक्कीच हसू येईल. कारण या देशांमध्ये तुम्ही कोणत्याही कंपनीचा टूथपेस्ट जरी वापरला तर तरी याला कोलगेट अस म्हटलं जातं. कोणत्याही कंपनीची सॉफ्टड्रिंक कजरी खरेदी केली तरी त्याला कोकच म्हटल जातं. आणि सरफ्फ कोणत्याही कंपनीचा असो त्याला कोब्रा म्हटलं जातं. सांगण्याचा अर्थ इतकाच की येथे प्रत्येक गोष्टीला एक ठराविक नाव आहे. मग तो ब्रँड कोणताही असला तरीही.

मित्रांनो तुम्हाला माहित आहे का कोणत्या देशाच्या सर्वात जास्त ऑफिस येईल भाषा आहेत? तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की झिंबॉम्बे या देशाच्या सर्वात जास्त ऑफिशियल भाषा आहेत. आणि त्या सर्व मिळून त्यांची संख्या सोळा आहे. आपण या देशांमध्ये सोळा वेगवेगळ्या भाषांमध्ये बोलू शकतो.

त्याबरोबरच हा एक असा देश आहे जेथे आठ वेगवेगळ्या मुद्रा वापरल्या जातात. आपल्या देशामध्ये रुपयाही एकच मुद्रा वापरली जाते परंतु झिंबॉम्बे मध्ये आठ वेगवेगळ्या मुद्रा वापरल्या जातात.

मित्रांनो झिंबॉम्बे हा जगातील सर्वात स्वस्त देशांमध्ये येतो. येथील पर्यटन करणे खूप फायद्याचे ठरू शकते. येथे चालणारी मुद्राही भारतीय रुपयांत खूप कमी आहे. झिंबॉम्बे मधील हॉटेल्स महाग असू शकतात, पण खाणे, पिणे, फिरणे आणि पर्यटन खूप स्वस्त आहे. याच कारणामुळे पर्यटक या सुंदर देशाची पर्यटनासाठी निवड करतात. जर तुम्ही सुद्धा कोणत्याही स्वस्थ देशाची ट्रिप प्लॅन करत असाल तर झिंबॉम्बेला तुमच्या यादीमध्ये नक्की ठेवा. प्रकृती आणि पशु प्रेमींसाठी हा देश एक चांगला विकल्प आहे अनेक प्रकारचे वन्यप्राणी तुम्ही येथे पाहू शकता.

मित्रांनो झिंबॉम्बे या देशामध्ये ज्या व्यक्तीचे पोट सर्वात मोठं आहे त्याला खूप धनवान समजलं जातं. आणि तो योग्य प्रमाणात मांस खात आहे असं म्हटलं जातं. तुम्हाला काय वाटतं या देशांमध्ये उलटी गंगा वाहते? कुठे पूर्ण जग आपल्या पोटाला कमी करण्यासाठी काम करत आहे आणि झिंबॉम्बे मधील लोक पोट वाढवून श्रीमंती दाखवत आहेत. खरंच खूप विचित्र आहेत तेथील लोक.

मित्रांनो तुम्हाला हे ऐकून खूप आश्चर्य वाटेल की सन 2008 मध्ये झिंबॉम्बे ची करन्सी इतकी खाली गेली होती की येथे एक सिंगल चीट टॉयलेट रोलची व्हॅल्यू सुद्धा त्यांच्या करन्सी पेक्षा जास्त झाली होती. म्हणूनच तर म्हटले जाते की एक बॅग भरून पैसे नेल्यानंतर एक मिठाचा पाकीट भेटत होतं.  कमाल आहे ना.

एका संशोधनानुसार असं लक्षात आलं की Total number of population आणि Total Number of unemployment in country च्या रेशो मध्ये झिंबॉम्बे खुप वरच्या स्थानावर आहे. दुःखाची गोष्ट तर ही आहे की येथे गरिबी खूप जास्त आहे. खूप सुधारणा होत आहेत तरीही हा देश पाठीमागेच आहे. येथील लोकांना कितीही मोठा प्रॉब्लेम असू दे तरीही येथील लोकांच्या चेहऱ्यावरून हास्य कधीच जात नाही. येथील लोकांमध्ये म्युझिक खूप प्रसिद्ध आहे.

तुम्ही हे ऐकून नक्कीच हैराण व्हाल की झिंबॉम्बे मध्ये डॉक्टर आणि नर्स ची खूप कमतरता आहे. येथील खूप साले डॉक्टर आपला देश सोडून दुसऱ्या देशात जाऊन राहिले आहेत. डॉक्टर हा देश सोडून जाण्यामागे हे कारण सांगितले जाते की तेथील लोक डॉक्टर पेक्षा जास्त जादूटोण्यावर विश्वास ठेवतात. हे लोक आपल्या आजारावरील निदान स्वतः करण्याच्या मागे लागतात. याच कारणामुळे गेल्या काही वर्षापासून खूप लोकांचा मृत्यू झाला आहे. येथे राहणारे अधिकाधिक पुरुष 57 वर्षापेक्षा जास्त जगू शकत नाहीत. होय मित्रांनो ही गोष्ट खरच आश्चर्यकारक आहे पण सत्य आहे. महिलांचे तर येथे अधिकच हाल आहेत. त्यांची अधिकाधिक आयुष्यमान 55 वर्षाच आहे. जादूटोण्यावर विश्वास ठेवल्यानंतर तर हेच हाल होणार ना.

मित्रांनो तुम्हाला माहित आहे का झिंबॉम्बे मध्ये पोलीस गाडीला सीज करू शकत नाहीत. कारण हे त्यांच्या नियमाविरुद्ध आहे. त्यांच्या देशाच्या नियमानुसार जर कोणी अपराध करून पळून जात असेल तरच पोलीस त्याच्या गाडीला त्यांच्या कब्जा मध्‍ये घेऊ शकतात.

Manufacturing, Mining आणि Farming या तीन गोष्टींवर पुर्ण देश अवलंबून असतो. परंतु या देशांमध्ये शेती करणे काही सोपे काम नाही. परंतु काही लोक पोट भरण्यासाठी येथे शेती करत आहेत.

मित्रांनो तुम्हाला या देशांमध्ये एकापेक्षा एक जंगली प्राण्यांचे दर्शन होईल. येथे हत्तींची संख्या खूप जास्त आहे. झिंबॉम्बे मधील प्रत्येक जंगलात तुम्हाला हत्ती आढळून येतील.

झिंबॉम्बे देशाची राजधानी आहे हरारे. एक काळ होता जेव्हा हरारे ला आफ्रिकेची राजधानी म्हणून ओळखले जात होते. पण 2008 नंतर येथील सर्व काही चित्र बदलले. मित्रांनो झिंबॉम्बे मध्ये फुटबॉल हा खूप लोकप्रिय खेळ आहे. येथील रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर फुटबॉल खेळताना मुले दिसून येतील.

झिंबॉम्बे मधील लोक भात आणि चिकन मोठ्या प्रमाणावर खातात. येथे भाताला खूप पसंद केले जातं. येथील 14 लाख लोक एड्स सारख्या आजाराने पीडित आहेत. होय मित्रांनो ही गोष्ट संशोधनातून समजली आहे. या प्रमाणेच येथील आठ लाख लोक कॅन्सर ने सुद्धा पीडित आहेत.

गेल्या काही वर्षापासून हा देश पुन्हा अर्थव्यवस्था उभी करण्याचा प्रयत्न करत आहे. झिंबॉम्बे कापूस, तंबाखू, सोने, टेक्स्टाईल इत्यादी गोष्टी एक्सपोर्ट करतो. The international Organization for Migration यांचं म्हणणं आहे की 2008 ते 2019 पर्यंत जवळजवळ तीस ते पस्तीस लाख लोक आपला देश सोडून बाहेर जायला गेले आहेत. पण आता हळूहळू ही परिस्थिती बदलत आहे.

मित्रांनो आफ्रिकेमध्ये झिंबॉम्बे चा साक्षरता दर सर्वात जास्त आहे. येथील जवळजवळ 90 टक्के लोक साक्षर आहेत. झिंबॉम्बे मधील अजूनही काही भागांमध्ये शिक्षणाला पाप मानले जाते. अनेक गावांमध्ये अजूनही शाळेची सुविधाच नाही.

झिंबॉम्बे मध्ये एप्रिल पासून ते ऑक्टोबर पर्यंत बिलकुल पाऊसच पडत नाही. असं मानलं जातं की येथे एप्रिल पासून ते ऑक्टोबर पर्यंत पाण्याची खूप कमतरता असते. सुरक्षेच्या बाबतीतही हा देश खूप खाली येतो. पण येथे पर्यटनासाठी तुम्ही बेफिकीरपणे फिरू शकता असं मानलं जातं.

निष्कर्ष:

तर मित्रांनो ही होती झिंबॉम्बे देशाविषयी माहिती (Zimbabwe information in marathi) tumhala ही माहिती कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांना पण नक्की शेअर करा.

Post a Comment

Previous Post Next Post